#CoronaAurangabad : घाटीत नवीन दोन कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ५३ वर , “त्या ” पोलिस उपअधिक्षकासह चार जणांच्या हातावर “होम क्वारंटाईन ” चे शिक्के

औरंगाबाद घाटीत रात्री नवीन दोन महिला रुग्णांचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल आला. दौलताबादच्या बस स्टॉप, छोटी मंडी येथील 53 वर्षीय आणि औरंगाबाद शहरातील असेफिया कॉलनीतील 39 वर्षीय या त्या महिला रुग्ण आहेत. त्यांना 25 रोजी घाटीत भरती करण्यात आले होते, असे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
एकूण 26 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
सध्या घाटीत एकूण सहा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर मिनी घाटीत 20 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे एकूण 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 05 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 53 कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळले आहेत.
“त्या ” पोलिस उपअधिक्षकासह चार जणांच्या हातावर “होम क्वारंटाईन ” चे शिक्के
दरम्यान ठाण्याहून औरंगाबाद शहराच्या जय नगर, ज्योतिगार भागात आलेले ठाणे महामार्ग पोलिस उपअधिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना औरंगाबाद पोलिसांनी त्यांची चौकशी करुन कोरोना चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले असता चाचणीसाठी त्यांच्या घशातील द्रव घेऊन त्यांच्या हातावर “होम क्वारंटाईन ” चे शिक्के मारून त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. हे पोलिस उपअधिक्षक महोदय ठाणे महामार्ग पोलिस विभागात पोलिस उपअधिक्षक म्हणून काम करतात त्यांनी कालच आजारी रजा टाकून जालन्याला जाण्यासाठी औरंगाबादेत धाव घेतली पण हे अधीक्षक औरंगाबादेत ज्योतीनगर ,उस्मानपुरा भागातील जयनगरमधे साईसिध्दी अपार्टमेंटमधे आज पहाटे ३ वा. पोहोचताच हि माहिती या परिसरातील नागरिकांनी उस्मानपुरा पोलिसांना याबाबत फोनवरुन दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांनी आपल्या पथकासह त्यांच्या अपार्टमेंटकडे धाव घेत त्यांची जिल्हा रुग्णालयात पुढील चाचणीसाठी रवानगी केली. हे पोलीस उपाधीक्षक मूळचे भोकरदनचे आहेत . औरंगाबाद हाॅटस्पाट असतांना ते येथे कशासाठी आले ? याची चौकशी केली जात आहेत त्यांच्या चाचणीचा प्राथमिक अहवाल रात्री उशीरा पर्यंत येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.