Aurangabad : कोरोना इफेक्ट : औरंगाबाद शहरात दहा तरुण झाले “कोरोना योद्धा”…

कोरोना इफेक्ट च्या काळात पोलिसांना सहकार्य करण्यासाठी स्वता:हून अप्रोच झालेल्या दहा तरुणांना पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी कोरोना वाॅरियर्स असे नाव देऊन नवी संकल्पना रुजवली आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या आरेफ काॅलनी, जलाल काॅलनी, आसेफिया काॅलनी या वसाहतीमधील तरुणांनी केवळ समाजसैवा म्हणून वसाहतीमधील नागरिकांना अत्यावश्यक सेवा त्यांच्या दारात देण्याचा मानस पोलिसांजवळ व्यक्त केला. या दहाही तरुणांना बेगमपुरा पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना प्रोत्साहित केले.
कोरोनामुळे उद्भवणारै परिणाम व त्यातून होणारा त्रास कमी करण्यासाठी वरील वसाहतीमधील दहा तरुणांनी हा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून राबवला.
मिर्झा जफर मिर्झा बिस्मीलाह बेग,खलील अहमद मौ.उस्मान, मो.जावेद,शै.फय्याज शे वहाब, इम्रानखान मसूदखान,शे.मसूद शे.महैमेद,नियत तब्बसूम, अय्यूबखान अशी या वाॅरियर्सची नावे आहेत.शहरात साथरोग कायद्याचे पालन होऊन निदान बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिक सोशल डिस्टंसिंग, व्यवस्थित पार पाडतील अशी आशा पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी व्यक्त केली.