Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : कितीही टाळ्या , थाळ्या वाजवा लोक नाही सुधारणार , अंत्यसंस्कारासाठी डॉक्टरचे शव नेणाऱ्या अॅम्ब्युलन्सवर हल्ला …

Spread the love

चेन्नईमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या एका डॉक्टरचे शव अंत्यसंस्कारासाठी नेत असताना किलपौक आणि अण्णानगरच्या नागरिकांनी अॅम्ब्युलन्सवर हल्ला केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे शव गावात आणू नये असे स्थानिकांचे म्हणणे होते. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. करोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांचे डॉ. सिमॉन हरक्युलस असे नाव आहे. अण्णानगरजवळ वेलंगुडू येथे अॅम्ब्युलन्सवर हल्ला झाला. लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीद्वारे मध्यरात्री हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीनजण जखमी झाले आहेत. हल्ल्यात सुदैवाने डॉक्टरांचे कुटुंबीय बचावले आहेत.

या हल्ल्यानंतर जमावाला पांगवल्यानंतर सुमारे ३ वाजण्याच्या सुमाराला डॉक्टरांच्या पार्थिवावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी आणखी एक लोकांचा जमाव टीपी छत्रम स्माशनभूमीजवळ जमल्याने तेथून या अॅम्ब्युलन्सला माघारी वळावे लागले होते. डॉ. सिमॉन हरक्युलस हे किलपौक येथील न्यू रोप मेडिकल सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक आणि न्यूरोसर्जन होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आजारी पडण्यापूर्वी त्यांनी अनेक फ्लूसदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तपासले आहे. मात्र, त्यांना करोनाची लागण कशी झाले हे मात्र समजू शकलेले नाही. त्याची मुलगीही डॉक्टर असून तिलाही करोनाची लागण झाली आहे.

डॉक्टर हरक्युलस यांचे अण्णानगरच्या वेलंगुडू स्माशानभूमीत दफन केल्याचे समजताच हातात लाठ्याकाठ्या घेऊन स्थानिकांचा एक जमाव स्मशानभूमीजवळ जमला. तेथे त्यांनी अॅम्ब्युलन्सवर हल्ला केला आणि तोडफोड केली. अॅम्ब्युलन्समधील दोन कर्मचारी आनंद आणि दामोदरन आणि महापालिकेचे सहायक अभियंता कालियासरन हे या हल्ल्यात जखमी झाले. त्याच अॅम्ब्युलन्समधून जखणींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तामिळनाडू शाखेने दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी  मुख्यमंत्री एडाप्पडी के. पलानीस्वामी यांच्याकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी नोल्लेरे येथील एका डॉक्टरांच्या अंत्यसंस्कारावेळी देखील स्थानिकांचा असाच विरोध झाला होता. हा विरोध अंबत्तूर आणि तिरुवेरकडू येथे करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!