पोलिसांचा बंदोबस्त भेदत चोरट्यांनी दोन दारूची दुकाने फोडली , लाखो रूपये किमतीची देशी-विदेशी दारू लंपास, दोघांना अटक

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रूपये विंâमतीची देशी-विदेशी दारू चोरून नेली. लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात चोरट्यांनी दारूच्या दुकानांना लक्ष केले आहे. गेल्या आठ ते दहा दिवसाच्या काळात शहरातील विविध भागात असलेली दारूची चार ते पाच दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. चोरट्यांनी गारखेडा परिसरातील देशी दारूचे दुकान फोडून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास केला. तर बाबा पेट्रोल पंप चौकातील मधु वाईनशॉप मधुन लाखो रूपये विंâमतीच्या विदेशी दारूवर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
लॉकडाऊन व संचारबंदीचा फायदा घेत चोरट्यांनी बाबा पेट्रोलपंप चौकात असलेले मधु वाईन शॉपचे शटर चोरट्यांनी उचकटले. चोरट्यांनी मधु वाईन शॉपमधुन लाखो रूपये विंâमतीची देशी-विदेशी दारू चोरून नेली आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
दरम्यान, चोरट्यांनी गारखेडा परिसरातील गोविंद राधेशाम जैस्वाल (वय ३२) यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकानफोडून १ लाख ७५ हजार ३५९ रूपये किमतीचे देशी दारूचे बॉक्स चोरून नेले. चोरट्यांनी जैस्वाल यांच्या मालकीच्या दुकानाचे शहर उचकटून स्टोअर रूमची भिंत फोडून दारूचे बॉक्स लंपास केले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत. दरम्यान, चोरट्यांनी बाबा पेट्रोल पंप चौकातील मधु वाईनशॉप दुकान फोडल्याने एकच खळबळ माजली आहे. वाईनशॉप पासून हाकेच्या अंतरावरच पोलिसांचा फिक्स पॉईन्ट असून पोलिस जवळच असतांना चोरट्यांनी केलेल्या दुकान फोडण्याचे धैर्य केले आहे.