Aurangabad NewsUpdate : पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

औरंंंगाबाद : हर्सुल-सावंगी परिसरात असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१७) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. रज्जाक सय्यद (वय १७, रा. हर्सुल परिसर) असे पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे.
रज्जाक सय्यद हा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरातून मित्रासोबत बाहेर पडला होता. हर्सुल-सावंगी परिसरात असलेल्या एका खदानीत पाणी साचले असून तेथे रज्जाक सय्यद हा मित्रासोबत पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने सय्यद रज्जाक हा पाण्यात बुडाला होता. हा प्रकार लक्षात आल्यावर सोबतच्या मुलांनी आजू-बाजूच्या लोकांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी एल.पी.चव्हाण, मोहम्मद मुज्जफर, प्रसाद शिंदे, तुषार तौर, दिेनेश मुंगसे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पाण्यात बुडालेल्या सय्यद रज्जाक याला पाण्याबाहेर काढुन उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी हर्सुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ताप आल्याने उपचारादरम्यान चिमूकल्याचा मृत्यू
औरंंंगाबाद : अचानकपणे ताप येवून आजारी पडलेल्या २७ दिवसाच्या चिमूकल्याचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. हडको एन-११ परिसरातील नवजीवन कॉलनी राहणा-या अशोक कोकाटे यांच्या २७ दिवसाच्या मुलाला अचानकपणे ताप आल्याने त्याला १४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारासाठी निमाई हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. चिमूकल्या बाळावर उपचार सुरू असतांना त्याचा १६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.