Aurangabad Crime : आर्थिक व्यवहारातून बांधकाम ठेकेदाराचा खून , पिता-पूत्र अटकेत

औरंगाबाद – आर्थिक व्यवहाराच्या वादतून ठेकेदाराला चाकूचे वार करुन खून करणाऱ्या पिता -पुत्राला वाळूज औद्योगिक पोलिस आणि गुन्हेशाखेने बेड्या ठोकल्या असल्याचे वृत्त आहे. नारायण कपूरचंद कवाल (४१) रा. कमळापूर असे मयताचे नाव आहे. तर महादेव सोनाजी ढोके आणि शंतनू उर्फ देवा ढोके असै अटक आरोपींची नावे आहेत. १५ एप्रिल रोजी वडगाव कोल्हाटीतील स्वस्तिक नगरात रात्री १०.३०च्या सुमारास नारायण कवाल याचा ढोके पितापुत्राने चाकूचे वार करुन खून केला.गुन्हा घडल्यानंतर काही मिनटातंच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी महादेव ढोकेला अटक केली.तर गांधीनगरात लपून बसलेल्या महादेव ढोकेच्या मुलाला गुन्हेशाखेने आज दुपारी २वा. अटक केली.महादेव ढोकेला २०तारखे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , महादेव ढोके यांच्याघराचे बांधकाम करण्यासाठी नारायण कवाल यांन मे २०१९ मधे ५ लाख रु.चा ठेका घेतला होता.ते बांधकाम जाने २० मधे पूर्ण झाले. ढोके यांनी कामाच्या सुरवातीला अडीच लाख आणि उर्वरित रक्कम १० हजार रु.महिन्याने फेडंणार असल्याचा व्यवहार ठरला होता. दरम्यान १५ एप्रिल रोजी नारायण कवाल पैसे मागण्यासाठी गेले असता, महादेव आणि देवा ढोके यांनी वाद घालून नारायण कवाल ला संपवले. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घेरडे करंत आहेत. वरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ.नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय विजय घेरडे,पीएसअय योगेश धोंडे,पोलिस कर्मचारी सय्यद मुजीब अली, तुकाराम राठोड, गजानन मांटे, भाउसिंग चव्हाण ,नितीन देशमुख यांनी पार पाडली.