Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Aurangabad : भरधाव कारची दुचाकीला धडक,  पती ठार, पत्नी व मुलगी जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : भरधाव वेगाने जाणा-या कारने दुचाकीला दिलेल्या धड़केत पती ठार तर पत्नीसह मुलगी जखमी झाले आहेत.  हा अपघात २९ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झाल्टा फाटा रोडवरील रेल्वे उड्डाणपुला नजीक झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालकाचा शोध पोलिस घेत आहेत.

Advertisements

अर्जुन आठवले ( रा. सुंदरवाडी) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अर्जुन आठवले हे पत्नी व  मुलीसह दुचाकीवरुन झाल्टा फाट्याकडुन कँब्रिज शाळेकडे जात होते. त्याची दुचाकी रेल्वे उड्डाणपुला जवळ असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने ( एम.एच. २० ईई७९६१) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. घटनेनंतर जखमींना मदत न करता कारचालक पसार झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेले अर्जुन आठवले यांचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी व मुलीवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सविता अर्जुन आठवले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सुरेश जारवाल करीत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!