#CoronaVirusUpdate : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय वाढ, ३२ जणांचा मृत्यू , गोरेगावात आढळले ४ रुग्ण

कोरोनाव्हायरस देशात फैलाव वाढत आहे. सोमवारी लॉकडाउनचा ६ वा दिवस होता, परंतु संक्रमित लोकांची संख्या वाढतच गेली. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत १२५१वर पोहोचली आहे. त्यापैकी १११७ सक्रिय प्रकरणे आहेत, तर ३२ लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, १०२ जणांनी या आजारावर मातही केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. सोमवारी महाराष्ट्रात २१६ लोक संसर्गित झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला.
दफरम्यान मुंबईतील गोरेगाव येथील बिंबिसार नगरमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ. खबरदारी म्हणून बिंबिसार नगरमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ आणि नोकरालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. चारही जणांना उपचारांसाठी हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बिंबिसार नगरमध्ये अनेक मराठी कलाकार राहतात. समूह संसर्ग होऊ नये म्हणून पालिकेनं परिसरात निर्जंतुकीकरण केलं आहे
भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाने अद्याप फार डोके वर काढलेले नाही. तिसऱ्या टप्प्यात पोहोचला नाही. २१ दिवसांचा लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची तातडीची योजना नाही, असे सोमवारी सरकारने सांगितले आहे. भारतीय सैन्याने पुढील महिन्यात संभाव्य आणीबाणीच्या घोषणेविषयी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली ‘बनावट’ पोस्ट नाकारलं आहे. सोमवारी राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिल्ली पोलिसांनी आज निजामुद्दीनमधील एका मोठ्या भागाला वेढलं आहे, जेथे काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तिला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.
तेलंगणात ६ जणांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता सुमारे दोनशे जणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणमधील सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत या कार्यक्रमात येणार्या लोकांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले आहे की नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम एक पृथक केंद्र बनविण्यात आले आहे, आवश्यकतेनुसार या लोकांना तिथे ठेवले जाईल. सोमवारी पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, भारतात संक्रमित रूग्णांची संख्या 100 ते 1000 पर्यंत पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले, तर या संकटात ग्रस्त विकसित देशांमध्ये या काळात रूग्णांची संख्या 3,500 ते 8,000 इतकी होती. संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आधारे, अग्रवाल म्हणाले की, विकसित देशांपेक्षा भारतात संक्रमणाच्या वाढीची गती कमी आहे.