#CoronaVirusEffect : Aurangabad : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या ५० जणांवर गुन्हे दाखल

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये उल्लंघन करणा-या ५० जणांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधीक गुन्हे सिटीचौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर राज्य शासनाने ३१ मार्च पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून फिरणा-याविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात ५० व्यक्तीविरूध्द ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात सिटीचौक-११, एमआयडीसी वाळुज-७, सातारा-६, दौलताबाद-४, उस्मानपुरा-४, सिडको-३, वेदांतनगर-३, जिन्सी-२, छावणी, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी , जवाहरनगर पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे एकूण ४४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.