‘चंदा राणी, मी तुला भेटायला येतोय…” असे WhatsApp वर स्टेट्स ठेवून “त्याने “ही केली आत्महत्या….

पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने या दुःखातून पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. “चंदा राणी, मी तुला भेटायला येतोय. आई-पप्पा, ताई, दाजी, मला माफ करा. मी जातोय..”, असा व्हॉट्सॅप स्टेट्स ठेवून पतीने आत्महत्या केली. त्यामुळे परभणीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सार्थक बचाटे असं या तरुणाचं नाव आहे. तो सोनपेठ तालुक्यातील वडगाव येथे आपल्या कुटुंबियांसह राहत होता . काही महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. गेल्या महिन्यातआपल्या पत्नीसह तो दुचाकीवरून गंगाखेडहून वडगावला जात असताना यावेळी झालेल्या भीषण अपघातात त्याची पत्नी चंदा हीच जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सार्थकला मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून त्याला प्रचंड नैराश्य आलं होतं. तो कुणाशीही मनमोकळं बोलत नव्हता. शिवाय तो कुणालाही भेटतही नव्हता अखेर याच नैराश्येतून त्यांनी आज झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
‘चंदा राणी, मी तुला भेटायला येतोय. आई-पप्पा, ताई, दाजी, मला माफ करा. मी जातोय,’ असा घरच्यांना उद्देशून आणि ‘भावांनो, तुम्हाला सोडून चाललो, माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही,’ असा मित्रांना उद्देशून व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवून त्यांनी आयुष्य संपवलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे वडगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.