Aurangabd : रेल्वेच्या दारात उभ्या असलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न , विशेष पोलीस अधिकाऱ्यासह नागरिकांची तत्काळ मदत…

औरंगाबादच्या प्रतापनगर २ेल्वे पुलाजवळ औरंगाबादहुन जालन्याकडे आणाऱ्या रेल्वे गाडीत जगदिेश नावाचा तरुण ऊभा असताना त्याच्या हातातील मोबइल रुळाजवळ उभ्या असलेल्या मुलानी हिसकवण्याचा प्रयत्न केला असताना रेल्वेतून पडून जखमी झाला. या बाबत विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांच्या दुकानातील कर्मचारी विलास सोनवणे यांच्या फोनवरथोडक्यात घटनेची माहिती मिळताच रेल्वेतून पडलेल्या तरुणाची मदत करून त्याच्या नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली . माहिती मिळताच त्याचे नातेवाईक संग्रामनगरगेटवर आल्यानंतर त्यांना सोबत घेऊन जखमी तरुणाला नाल्यातून बाहेर काढून त्वरित घाटी रुग्णालयात दाखल केले. यासाठी श्रीमंत गोर्डे, विलाससोनवणे, पवन बाविस्कर, जितेंद्र पटेल, जगदीश मंगलसिंग , यांनी साहाय्य केले आणि ऊस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तारे , रेल्वेचे एएसआय दिलीप काबळे यांना दिली. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून या तरुणासोबत त्याची आई व पत्नी सविता आहेत. या कमी साहाय्य केल्याबद्दल त्यांनी गोर्डे पाटील यांच्यासह सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.