अल्पवयीन शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत शिक्षकाची यथेच्छ धुलाई

अल्पवयीन मुलीची शिक्षकाने छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला आहे. उस्मानाबाद शहरातील धाराशिव प्रशाला शाळेतील हा प्रकार असून शिक्षक मोहन सुरवसे याने छेडछाड केल्याचा पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांचा आरोप आहे. पीडित मुलगी हि सहावीत विद्यार्थिनी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिक्षक हा मुलीला वर्गात शिकवण्याच्या बहाण्याने जवळ बोलवून तिच्याशी अश्लील चाळे करत होता. विकृत शिक्षकाच्या या कृत्यामुळे मुलगी आज शाळेत जात नव्हती. जेव्हा घरच्यांनी तिला विचारला असता तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी याबाबत शिक्षक सुरवसेला जाब विचारत त्याची चांगलीच धुलाई केली आणि त्याला उस्मानाबाद शहर पोलिसाच्या ताब्यात दिले. पोलिसांनी देखील आरोपीला ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकानेच असे असे कृत्य केल्याने शहरात खळबळ माजली असून या शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.