दहावीचा पेपर फुटला नाही, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

Advertisements
Advertisements
Spread the love

जळगाव जिल्ह्यातील केंद्रावर दहावीच्या मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाले होते. याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून  माहिती घेतली. याबाबत नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला. विभागीय सचिवांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार वरिल परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे नमूद केले आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे वृत्त चुकीचे असल्याचे  स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

Advertisements

जळगाव जिल्ह्यातील परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी भाषा विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आले होते. वास्तविक त्यात कुठलेही तथ्य नाही. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. वर्षा  गायकवाड यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना परिक्षेनिमित्त  हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, अशा पध्दतीच्या पेपरफुटीच्या बातम्या पसरविणाऱ्या माध्यमांनीही परीक्षार्थींच्या मानसिकतेवर परिणाम होईल, अशा बातम्या प्रसिध्द करू नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री, प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!