तिहेरी अपघातात ९ जण जागीच ठार २४ जखमी , रॉंग साईड आलेल्या टँकरने अर्ध्या पर्यंत चिरली बस, तर बसवर आदळली भरधाव क्रुझर !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पोखरण गावाजवळ नागपूर-सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत सोनगडजवळ शहराजवळ गुजरात राज्य परिवहन मंडळाची बस,टँकर आणि क्रुझरचा विचित्र तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात ९ प्रवाशांचा जागेवरच मृत्यू झाला  तर २४ प्रवाशी  जखमी झाले आहेत. टँकर राँग साईडने येत समोरुन येणाऱ्या बसमध्ये घुसले. यात बस अर्ध्यापर्यंत कापली गेली. नंतर मागून येणारी भरधाव क्रुझर देखील बस आणि टँकरवर आदळली.

Advertisements

या अपघाताविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त बस कुशलगठ-सुरत-उकई अशी निघाली होती. बस सोनगडजवळील पोखरण गावाजवळ येताच समोरुन राँग साईडने येणारा टँकर आणि बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. नंतर भरधाव येणारी प्रवाशी क्रुझरने बसला मागून धडक दिली. अपघातात ९ जणांचा जागेवर मृत्यू झाला. जखमींना व्यारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisements
Advertisements

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच गुजरात पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांना बसमधून बाहेर काढून व्यारा तसेच सोनगड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!