Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : सेव्हनहिल पुलावर अपघात, राँगसाईड दुचाकीच्या धडकेत महिला ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

विरुध्द दिशेने भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत विमा कंपनीतील महिला कर्मचारी ठार झाली. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सेव्हनहिल उड्डाणपुलावर घडला. या अपघातात महिलेला धडक देणारा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला आहे. गितांजली आनंदराव जेहुरकर (२९, रा. मातोश्री अपार्टमेंट, सदाशिवनगर, रामनगर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राहुल शिंदे असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
काल्डा कॉर्नर परिसरातील स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीत जेहुरकर या नोकरीला होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी त्या दुचाकीने (एमएच-२०-१९९०) सिडको चौकाकडून काल्डा कॉर्नरकडे जात होत्या. सेव्हनहिल उड्डाणपुलावरुन जात असताना अचानक विरुध्द दिशेने आलेल्या भरधाव दुचाकीस्वार राहुल शिंदेने त्यांना धडक दिली. या अपघातात जेहुरकर यांच्या डोक्याला पुलाच्या कठड्याचा फटका बसला. त्यामुळे डोके फुटून त्या गंभीर जखमी झाल्या. तर राहुल शिंदे हा देखील अपघातात जखमी झाला. यानंतर दोघांना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान जेहुरकर यांचा मृत्यू झाला. तर राहुल शिंदे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक मिरा चव्हाण करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!