Sad News : दोन मुले तलावात बुडाली, मिसारवाडीत शोककळा

औरंगाबाद – बुधवारी दुपारी मिसारवाडीतील दोन मुले महालपिंप्री तलावात बुडुन मरण पावली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
साहेबखान मुमताजखान(१६) व संदेश गंगाराम कापसे (१७) वर्ष अशी मृतांची नावे आहेत. आज दुपारी साहेबखान आणि संदेश पोहोण्यासाठी तलावात उतरले. पण बराचवेळ झाला तरी वर आले नाहीत.यामुळे तलावाजवळील तरुणांनी चिकलठाणा पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करंत घटनास्थळी धाव घेतली.पण वरील दोघांचे मृतदेह शोधण्यास तब्बल पाच तास लागले.वरील दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले.अशी माहिती एपीआय महेश आंधळे यांनी दिली