बारावीची परिक्षा : मास काॅपी करणारे चार शिक्षक वाळूज औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील गजानन ज्युनिअर काॅलेज मधे ४ माध्यमिक शिक्षकांना एम. वाळूज पोलिसांनी मंगळवारी (आज) दुपारी ताब्यात घेतले.त्यांच्या विरोधात उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या तक्रारीवरुन विद्यापीठ व बोर्ड अधिनियमानुसार गैरव्यवहारांना पायबंद घालण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी छावणीच्या क्राईस्ट चर्च शाळेचे शिक्षक शरण्णप्पा साधू रक्षाळकर (४८) गजानन काॅलैज चे कल्याण रघुनाथ कुलकर्णी, पी.एम. ज्ञानमंदीर शाळेचे ललेश हिलाल महाजन (३७) तर वाळूजच्या महाराष्र्ट ज्युनिअर स्कूल चा अक्षय प्रकाश आरके(२६) या चोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर परिक्षा केंद्राच्या प्रमुख महिला अधिकार्याने वरील आरोपींना प्रश्न पत्रिकांचे उत्तरे मासकाॅपी करु देण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. रक्षाळकर शिक्षकाच्या सांगण्यावरुन वरील तीन शिक्षक मासकाॅपी करंत असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले वरील कारवाई पोलिस निरीक्षक मधुकर सावंत , पीएसआय प्रीती फड, पोलिस कर्मचारी रामदास गाडेकर, विलास धनवटे, नईम शेख व उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी पार पाडली