Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बिहार : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी घातलेल्या पुष्पहारानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याची गंगाजलाने केली शुद्धता !!

Advertisements
Advertisements
Spread the love

बेगुसराय जिल्ह्य़ातील बलियापरिसरातील  डॉ. आंबेडकर उद्यानात बसविण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार पुतळ्याला केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी अर्पण केला होता. याच ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेपूर्वी भाकप आणि राजदच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गंगाजलाने शुद्ध केला. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हा पुतळा ‘अशुद्ध’ केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आणि पुतळा शुद्ध केला!

Advertisements

वृत्त से आहे कि , गिरीराज सिंह यांच्या सभेनंतर २४ तासांनी भाकपचे स्थानिक नेते सनोज सरोज आणि राजदचे विकास पासवान आणि रूपनारायण पासवान तेथे गंगाजल घेऊन आले आणि त्यांनी पुतळ्यावर गंगाजल शिंपडले. गंगाजलाने पुतळा पूर्णपणे धुताना या कार्यकर्त्यांनी जय भीम आणि म. ज्योतिबा फुले यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. सरोज आणि पासवान हे सीएएविरुद्ध आंदोलन करीत आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!