Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या पत्नीनेच केला हिंदुत्ववादी नेत्याचा “गेम ” , तिघांना ठोकल्या बेड्या…

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशातील  हिंदुत्त्ववादी नेता रणजीत बच्चनच्या हत्याकांडानं लखनौसह देशभर एकच खळबळ उडालीलेली असताना पोलीस रणजित बच्चनच्या खुन्यापर्यंत पोहोचले असून यामध्ये त्याच्या दुसऱ्या पत्नीसहित तिच्या प्रियकराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना जी माहिती मिळाली ती हादरवून टाकणारी आहे. रणजीत बच्चन यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असून त्यामागे एक ‘थप्पड’ असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून एक आरोपी अजूनही फरार आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे हिंदुत्ववादी नेता रणजीतची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून त्यांच्या दुसऱ्या पत्नीनेच प्रेमात अडथळा ठरणाऱ्या रणजीतचा प्रियकराच्या मदतीनं काटा काढला असून या हत्याकांडात स्मृतीचाही थेट सहभाग असल्याचं समोर आले आहे.

Advertisements

पोलिसांना मिलेल्या माहितीनुसार मयत रणजीत यांची पत्नी स्मृतीचे दिपेंद्रसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती रणजीत यांना कळाली. त्यावर संतप्त होवून रणजीत यांनी स्मृतीला ‘थप्पड’ लगावली. त्या थप्पडचा राग तिच्या मनात होता. तिला आणि दिपेंद्रला रणजीतपासून सुटका हवी होती. त्या दोघांना एकत्र राहायचं होतं. त्यामुळे दोघांनी मिळून रणजीतच्या हत्येचा कट रचला. दिपेंद्र विकासनगरच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. २९ आणि ३० जानेवारीला त्यानं रणजीतची रेकी केली. १ फेब्रुवारीच्या रात्री रायबरेलीवरून चालत तो लखनौला पोहोचला. हत्याकांडात वापरलेली पांढरी बलेनो कार पोलिसांनी ताब्यात घेतलीय. हत्याकांडासंदर्भातले सगळे पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत. खुनी हत्या केल्यानंतर रायबरेलीला पळून गेले. एवढंच नाही तर दिपेंद्रनं हत्येच्या दिवशी दोन फोन आणि सिमकार्ड वापरले. पोलिसांनी तेही जप्त केलेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या केवळ घृणेतून झालीय. आरोपींनी आपला गुन्हा कबूल केल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!