Aurangabad Crime : रेकार्डवरचा दरोडेखोर आणि वाळू तस्करांनी लांबवलेले ६८ लाखांचे टायर जप्त, वाळू तस्कर अटकेत, दरोडेखोर फरार,ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

औरंगाबाद -रेकाॅर्डवरच्या दरोडेखोराने हैद्राबादला नेणारे ट्रक चे टायर समृध्दी महार्गावर हायवा चालवणार्या वाळू तस्कर आणि ठेकेदाराच्या मध्यस्तीने आळंद परिसरात विक्री केले.पण ग्रामीण गुन्हेशाखेने विक्री केलेले ६७ लाख ९० हजारांचे टायर जप्त करत दोन माजी वाळू तस्करांना अटक केली.या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुभाष सुखदेव भांबर्डे रा.सताळपिंप्री ता.फुलंब्री आणि रविंद्र विष्णू तांगडे रा.शंकरपूर ता गंगापूर अशी अटक आरोपींची नावे आहेत.वरील दोन्ही आरोपींपैकी सुभाष भांबर्डे याचे आठ ट्रक समृध्दी महामार्गासाठी दगड माती ची वाहतूक करतात.तर रविंद्र तांगडे हा समृध्दी महामार्गासाठी मजुर पुरवठा करतो.तर फरार आरोपी योगेश अर्जून लघाने रा. रांजणगाव खुरी ता. पैठण हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे.
दि. २ फेब्रूवारी रोजी नाशिक च्या सातपूर एम.आय.डी.सी.तून हैद्राबादला सिएट कंपनीचे टायर मेघा फ्राईट अॅड मुव्हर्स या कंपनीने योगेश लघाने चालक असलेल्या ट्रकमधे भरुन रवाना केले.पण हैद्राबादला अद्याप ट्रक पोहोचला नसल्याचे औरंगाबादचे मेघा फ्राईट चे मॅनेजर ओमप्रकाश प्रजापती यांना समजले. त्यांनी ट्रक चालक लघाने शी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान आरोपी लघाने याने टायरने भरलेला ट्रक आळंद परिसरात रिकामा करुन वाळूज औद्योगिक परिसरात सोडून दिला होता.त्याचवेळैस आळंद परिसरात सिएट कंपनीचे ट्रक टायर बिना बिल चे स्वस्तात विक्री होत असल्याचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांना कळाले होते. त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता टायर नाशिक येथील मेघा मुव्हर्स कडून आल्याचे उघंड झाले.त्यानुसार पोलिस निरीक्षक फुंदे यांनी मेघा फ्राईट अॅंड मु व्हर्स च्या अधिकार्यांना वरील प्रकार कळवून चोरीची फिर्याद देण्याचे सांगितले.त्याच काळात मेघा फ्राईट च्या औरंगाबादेतील कर्मचार्यांना लघानेने टायर वाहतूकीसाठी वापरलेला रिकामा ट्रक सापडला. म्हणून मेघाफ्राईटच्या प्रजापती यांच्या तक्रारीवरुन वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वरील कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पी.एस.अय भगतसिंग दुलंत यांच्या पथकाने पार पाडली