Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttar Pradesh : भारत माता कि जय आणि राष्ट्रगीत गात पत्नीचे शीर कापून पोलीस ठाण्यात निघालेल्या तरुणाला रस्त्यातच घेतले ताब्यात…

Advertisements
Advertisements
Spread the love

उत्तर प्रदेशची बाराबंकीमध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केल्यानंतर, तिचे  शिर हातात घेऊन  पोलीस ठाण्याकडे निघालेल्या आरोपी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . विशेष म्हणजे  हा आरोपी  तरूण राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देत पोलीस ठाण्याकडे निघाला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला पोलिसांनी गाठले  आणि ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणात विवाहितेच्या वडिलांनी तिच्या पतीसह पाच जणांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार , बहादूरपूरचा रहिवासी अखिलेश रावत (वय २५) हा शनिवारी दुपारी दीड वाजता हातात पत्नीचं कापलेले शिर घेऊन रस्त्यावरून जात होता. या घटनेमुळं परिसरात एकच घबराट निर्माण झाली याबाबत काही लोकांनी पोलिसांना माहिती  देताच पोलीस घटनास्थळी हजार झाले त्यावेळी आरोपी अखिलेश पत्नीचं शिर हातात घेऊन राष्ट्रगीत गात आणि भारत माहित कि जय अशा घोषणा देत निघाला होता त्यावेळी त्याला पोलिसांनी तत्काळ  ताब्यात घेतलं. त्यानंतर ते त्याच्या घरी गेले. तिथे  पत्नी रंजना (वय २२) हिचे  धड रक्ताच्या थारोळ्यात पडले  होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश आणि रंजना यांचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं होतं. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. महिनाभरापूर्वीच रंजनानं एका मुलीला जन्म दिला होता. काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला होता.

Advertisements
Advertisements

पोलीस अधीक्षक अरविंद कुमार चतुर्वेदी यांनी याविषयी सांगितलं की, अखिलेशचा शनिवारी पत्नी रंजनासोबत वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली. रंजनाचे वडील रामगोविंद यांनी हुंड्यासाठी मुलीचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप अखिलेशवर केला आहे. अखिलेशसह त्याचे वडील, आई आणि बहिण आणि भावाविरोधात तक्रार दिली आहे. रंजनाच्या मुलालाही अखिलेशनं गळा आवळून मारलं होतं, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, बाराबंकीच्या जहांगीराबाद ठाण्याच्या हद्दीत गेल्या १३ वर्षांत अशा चार घटना घडल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!