Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महिला तहसीलदारांचा उल्लेख “हिरोईन ” म्हणून केल्यामुळे माजी मंत्री बबन लोणीकर वादात…

Spread the love

एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्याचे माजी पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर सभामंचावर  बसलेल्या महिला तहसीलदारांना उद्धेशून “आमच्या तहसिलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात…”  असे  विधान केल्यामुळे बबन लोणीकर नव्या वादात अडकले आहेत. परतूर तालुक्यातीला एका गावातील वीज केंद्राच्या  उद्धाटन प्रसंगी हा प्रकार घडला असून बबन लोणीकर यांच्या या विधानाचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना बबन लोणीकर म्हणाले कि , शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच राज्यातील सरकार त्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देईल. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का?, की एखादी हिरोईन आणू?, हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, असे लज्जास्पद विधान बबनराव लोणीकर यांनी केले आहे. स्टेजवर त्यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, तहसिलदार मॅडम, सरपंच बसलेले होते. लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर तहसिलदार मॅडम स्टेजवरून उठून गेल्या. परंतु, लोणीकर यांना मात्र  याविषयी काहीच वादग्रस्त वाटले नाही. मी जे काही बोललो त्यात काहीच वावगं नाही, असे लोणीकर म्हणत आहेत.

बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परतूर तालुक्यातील एका गावात वीज उपकेंद्राचे उद्धाटन  झाले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. स्टेजवर त्यांचा मुलगा बसला होता. जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि तहसिलदार मॅडम बसलेल्या असताना लोणीकर यांनी हे विधान केल्याने याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे. लोणीकर यांच्या विधानाचा तहसिलदार संघटनेने याचा निषेध केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी लोणीकर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. गर्दी जमवण्यासाठी इतक्या खालच्या थराला जाणाऱ्या लोणीकर यांनी जाहीर माफी मागावी तसेच तहसिलदार असलेल्या महिलेने पुढे येऊन लोणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, असे विद्या चव्हाण एका टीव्ही माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!