वाहनांचे स्पेअर पार्ट चोरणारी टोळी जेरबंद, एकाचा आत्महत्येचा प्रयत्न,२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद- टू आणि थ्री व्हिलर चे स्पेअरपार्ट चोरणारी चौघांची टोळी गुन्हे शाखेने आज (३१/१) जेरबंद केली.चोरट्यांच्या ताब्यातून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.तर अटकेतील एका आरोपीने हातावर काच मारुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.म्हणून पोलिसांच्या फिर्यादीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणार्या आरोपी विरुध्द वेगळा गुन्हा दाखल केला.तर या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात २५जानेवारी रोजी गुन्हा दाखल झालेला होता.
अविनाश केलास थोरात(२७) धंदा ड्रायव्हर रा. रामराई रोड वाळूज, दादाभाऊ तात्याराव खुडे(३९) रा.बकवालनगर,नवनाथ संजय वाघचौरे(२२) ,सय्यद खलीक सय्यद रशीद (२७)दोघेही रा.गाढेपिंपळगाव ता.वैजापूर अशी अटक आरोपींची नावे आहेत या पैकी अविनाश थोरात हा बजाज आॅटो मधे चालक म्हणून वर्षभरापूर्वी नौकरी करंत होता. अविनाश थोरातनेच दादा खुडे सौबंत वाहनांचे स्पेअरपार्ट असलेला ट्रक चोरुन नेत नवनाथ वाघचौरे आणि सय्यद खलीक यांच्या घरात मुद्देमाल लपवून ठेवला. वरील आरोपींपैकी अविनाश थौरात ने पोटावर फोडलेल्या बाटलीने वार करुन घेतले.त्याच्यावर पोलिसांनी उपचार करुन त्याला नोटीस बजावून कुटुंबियाच्या हवाली केले. वरील कारवाई गुन्हेशाखेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त श्रीकांत नवले, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय गौतम वावळै एएसआय शेख नजीर, चंद्रकांत गवळी, सतीश जाधव रामदास गायकवाड यांनी पार पाडली.