Aurangabad : कच-याच्या वाहनाची धडक, एटीएसचे जमादार बालंबाल बचावले

कच-याच्या वाहनाने धडक दिल्याने एटीएसचे जमादार गंभीर जखमी झाले. डोक्यात हेल्मेट असल्याने ते या अपघातात बालंबाल बचावले. हा अपघात सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे ते तथागत चौक रस्त्यावर झाला.
एटीएसचे जमादार रामनाथ कडूजी इथापे (५०, रा. भुवीआनंदबन, बीडबायपास, गांधेली) हे शासकीय कामासाठी कार्यालयीन दुचाकी (एमएच-२०-बीए-३१२१) वापरतात. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास ते एका कामासाठी चिकलठाणा एमआयडीसीतून जात होते. तथागत चौक ते एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे या रस्त्यावरुन जात असताना महानगर पालिकेच्या कचरा गाडीने (एमएच-२०-ईएल-०१०२) त्यांना ठोकरले. त्यामुळे त्यांच्या उजव्या पायाला, पोटरीजवळ, छातीला आणि डाव्या हाताच्या अंगठ्याला मुक्का मार लागला. मात्र, डोक्यात हेल्मेट असल्याने ते बालंबाल बचावले. हा अपघात घडताच कचरा गाडीच्या चालकासह एकाने धुम ठोकली. या अपघातानंतर इथापे यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.