भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे सोपविणे हा राज्याच्या कारभारात हस्तक्षेप : प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने एनआयएकडे दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दात टीका केली असून तपासातील खोटेपणा उघड होण्याची भीती वाटल्यानेच केंद्र सरकारने हा तपास एनआयएकडे सोपवल्याचा दावा केला. त्यामुळे आता शिवसेनेची खरी परीक्षा असल्याचंही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या हत्येच्या षडयंत्राची चर्चा ही केवळ टीआरपी वाढवण्यासाठीच होती, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. राज्य सरकारच्या कारभारात केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे. केंद्र आणि राज्याच्या कुरघोडीच्या राजकारणात आरोपींचा बळी जाण्याची शक्यता आहे,अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावरून तोफ डागताना वंचित बहुजन आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणले कि , पूर्वी माजी गृहमंत्री, दिवंगत आर. आर. पाटील हे भिडे गुरुजींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आता राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे काम करत आहेत. आंबेडकरांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिस अधीक्षकांच्या वतीने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावरच टीकेची तोफ डागली. एसपीच्या रिपोर्टमध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं आहेत तरीही भिडेंना वाचवण्याचं काम पूर्वी आर. आर. पाटील यांनी केलं. आता हे काम जयंत पाटील करत आहेत. भाजपचं काम राज्य सरकारमधील मंत्रीच करत आहेत, असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी केला आहे.