प्रजासत्ताक दिन : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला राजा बनवलं, पिचलेल्या वर्गाला मुख्यप्रवाहात आणण्याचं भागवत यांचं आवाहन

"संविधान ने देश के हर नागरिक को राजा बनाया है।राजा के पास अधिकार हैं लेकिन अधिकारों के साथ सब अपने कर्तव्य और अनुशासन का भी पालन करें।तभी देश को स्वतंत्र कराने वाले क्रांतिकारियों के सपनों के अनुरूप भारत का निर्माण होगा।"-मोहनजी भागवत
पू.सरसंघचालक जी ने गोरखपुर में ध्वजारोहण किया pic.twitter.com/fgKgbe38y3— RSS (@RSSorg) January 26, 2020
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. गोरखपूर येथील सरस्वती शिशू मंदीर माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनी भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना भागवत म्हणाले कि, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला राजा बनवलं. त्यांना अधिकार दिले. पण अधिकारांबरोबरच प्रत्येकाने आपली कर्तव्य आणि अनुशासनाचं पालन करण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी पिचलेल्या वर्गाला मुख्यप्रवाहात आणण्याचं आवाहनही केलं
विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना भागवत पुढे म्हणाले कि , अधिकाराबरोबरच नागरिकांनी कर्तव्य आणि अनुशासनाचं पालन केलं पाहिजे. तेव्हाच देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत निर्माण होईल. अनुशासन आणि कर्तव्य पालनामुळेच मानवतेच्या भल्यासाठी समर्पित होणारा नवा भारत निर्माण होईल, असंही ते म्हणाले.
यानिमित्ताने संघाच्या कार्याची ओळख करून देताना ते म्हणाले कि , आरएसएस आपल्या लोकांसाठी कार्यरत आहे आणि समाजातील सर्वात खालच्या वर्गातील लोक ही संघाची आपली माणसं आहेत. रावण सुद्धा प्रज्ञावंत होता. पण त्याची विचार करण्याची पद्धत चुकीची होती. त्यामुळे एका देशाचा विनाश झाला. त्यामुळे विद्येचा उपयोग योग्य प्रकारे केला पाहिजे. बळाचा उपयोग दुर्बलांच्या संरक्षणासाठी आणि धनाचा उपयोग गरिबांच्या सेवेसाठी केला पाहिजे समर्थ, वैभवशाली आणि परोपकारी भारत निर्माण करण्यासाठीच प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. कर्तव्य बुद्धीने कार्य केलं तरच हे लक्ष्य आपण गाठू शकतो. त्यामुळे देश विकासाच्या मार्गावर पुढे जाईल, असंही त्यांनी सांगितलं.