Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात फाशी झालेला एक आरोपी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात…

Spread the love

देशभर गाजलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख ठरलेली असतानाही चार आरोपींपैकी एक आरोपी मुकेश सिंह याने  राष्ट्रपतींच्या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात पुन्हा आव्हान दिले आहे. मुकेश सिंहचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला मुकेशच्या वकिलांनी आव्हान दिलं आहे. १७ जानेवारीला मुकेश याचा दया अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयात २७ जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

त्याच्या वकिलांनी म्हटले आहे कि , मुकेश सिंह याने तिहार तुरुंग प्रशानसाकडे दयेचा अर्ज दिला होता. तिहार तुरुंगामार्फत हा अर्ज दिल्ली सरकार, त्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल आणि मग केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत राष्ट्रपतींकडे गेला होता.

दरम्यान निर्भयाच्या चारही गुन्हेगारांचा डेथ वॉरंट जारी झाला असून त्यांना १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता फाशी दिली जाणार आहे. तत्पूर्वी, त्यांना २२ जानेवारीला फाशी देण्यात येणार होती. तसा डेथ वॉरंटही निघाला होता. मात्र, त्यानंतर दोषींपैकी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज दाखल केला. तो राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर अन्य आरोपी पवन कुमार याने घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका केली. अखेर सर्व याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता दोषींना फाशी देण्याचे डेथ वॉरंट जारी केले. मात्र त्यानंतरही याचिका करून फाशी लांबवण्याचे प्रकार सुरूच असून आता मुकेश सिंह याने दया अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!