Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रजासत्ताक दिन : मध्यप्रदेशात ध्वजारोहणप्रसंगी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये हाणामारी

Advertisements
Advertisements
Spread the love

देशात सर्वत्र ७१ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना मध्य प्रदेश काँग्रेसच्या इंदूर येथील पक्ष कार्यालयात  ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना पक्षाच्या नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याने या कार्यक्रमाला गालबोट लागले. हे भांडण अधिकच वाढत असल्याचे पाहून इतर कार्यकर्ते आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या नंतर कसेबसे या नेत्यांना शांत करण्यात कार्यकर्ते आणि पोलिसांना यश आले.

Advertisements

इंदूर येथील खरे तर काँग्रेसच्या कार्यालयात मुख्यमंत्री कमलनाथ हे ध्वजारोहण करत होते. या दरम्यान पक्षाचे दोन नेते देवेंद्र सिंह यादव आणि चंदू कुंजीर यांच्यात हाणामारी सुरू झाली. या दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे भांडण सुरू झाले हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हे भांडण वाढत जात असल्याचे पाहत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न. शेवटी पोलिसांनाही मध्यस्ती करावी लागली.

Advertisements
Advertisements

मुख्यमंत्री स्वतः कमलनाथ हे प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देखील आहेत. गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर कमलनाथ यांना कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. देशाची संस्कृती आणि राज्य घटनेविरोधात जाणाचा प्रयत्न करणाऱ्या लोकांशी आपण मुकाबला केला पाहिजे असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!