Aurangabad Crime : अटकेतील भामट्यांकडून आणखी १ कोटींची फसवणूक उघडकीस, तीघे फरार, गुन्हेशाखेची कामगिरी

औरंगाबाद- चांदी किंवा इतर धातूंच्या दागिन्यांना सोनेरी मुलामा देऊन,व बॅंकेच्या अधिकृत व्हॅल्यूअर सोबत कट रचून नगर अर्बन आणि महाराष्र्ट ग्रामिण बॅंकेतून १कोटी५लाख ४हजार रु.कर्ज उचलणारे भामटे गुन्हा दाखल हौताच फरार झाले.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गंगाधर नाथराव मुंढे, मंगेश नाथराव मुंढे आणि दिगंबर गंगाधर डहाळे अशी फरार आरोपींची नावे आहेत.या पैकी गंगाधर मुंढे हा रेकाॅर्डवरील गुन्हैगार आहे.
दोन दिवसांपूर्वी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शरद आणि सचिन शहाणे यांच्यावर बनावट सोने बॅंकांकडे तारण ठेवून लाखो रु. कर्ज मिळवून देण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच आरोपींनी नगर अर्बन आणि महाराष्र्ट ग्रामिण बॅंकेतही रमैश गंगाधर उदावंत या व्हॅल्यूअर ने तीघांना बनावट सोन्यावर गोल्ड लोन मिळवून दिल्याची माहिती समोर आली. म्हणून गुन्हेशाखेने रमेश उदावंत याची चौकशी केली असता रेकाॅर्डवरील गुन्हैगार गंगाधर मुंढे व त्याचे दोन साथीदा मंगेश मुंढे आणि दिगंबर डहाळे यांनी उदावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचा मुलामा असणार्या दागिन्यांवर १कोटी ५लाख रु.कर्ज खडकेश्वर परिसरातील नगर अर्बन आणि समर्थ नगरातील महाराष्र्ट ग्रामीण बॅंकेकडून कर्ज मिळवले असल्याचा प्रकार उघडकीस आला.म्हणून गुन्हेशाखेने पंचसमक्ष व्हिडोओशुटींग मधे पंचनामा करत बनावट दागिन्यांचे प्रकरण उघडकीस आणले. ग्रामीण बॅकेचे व्यवस्थापक अच्यूत दुधाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी गुन्हेशाखा सहाय्यक आयुक्त श्रीकांत नवले, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय मनोज शिंदे,पोलिस कर्मचारी नितीन मोरे, नितीन देशमुख, भगवान शिलोटे, विलास वाघ,यांनी पार पाडली.