Aurangabad Crime : दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोरांची टोळी गजाआड, १ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद : दरोडा अथवा लुटमारी करण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरत असलेल्या मालेगांव येथील दरोडेखोरांच्या टोळीला क्रांतीचौक पोलिसांनी १४ जानेवारी रोजी पहाटे दिड वाजेच्या सुमारास गजाआड केले. या टोळीच्या ताब्यातून पोलिसांनी दरोड्यासाठी लागणारे साहित्य, दोन दुचाकी असा एवूâण १ लाख २१ हजार ६०० रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नावीद अहमद शफीक अहमद (वय २६), अब्दुल आहद मोहम्मद इब्राहीम (वय २९), मोहम्मद आमीन मोहम्मद शमसुद्दोहा (वय ३२), मुक्तार अहमद मोहम्मद आय्युब (वय २६), शेख सलीम शेख आमीन (वय २६) सर्व रा. मालेगांव, जि. नाशिक असे अटक केलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
सहाय्यक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर, पोलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक डीबी पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल सुर्यतळ, उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार नसीम खान, जमादार सय्यद सलीम, जैस्वाल, मनोज चव्हाण, फिरंगे, संतोष रेड्डी, राजेश चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, देवानंद मरसाळे, जावेद शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.