Aurangabad : घाटी रुग्णालयातील एमडी डॉक्टरची इंजेशन घेऊन आत्महत्या

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालयातील प्रतिथयश डॉक्टर शेषाद्री गौडा (28) यांनीं आज आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. डॉ. गौडा याच महाविद्याचे विद्यार्थी होते. एमडी मेडिसिन असलेले डॉक्टर गौडा हे सुवर्णपदक विजेते होते. अतिशय हुशार आणि मनमिळावू अशी त्यांची ख्याती होती. असा लौकीक असतानाही त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. दरम्यान गौडा यांची सुसाइड नोट पोलिसांनी जप्त केली आहे.
औरंगाबादेतील आपल्या बेगमपुरा येथील निवासस्थानी गौडा यांनी विषारी रसायन असलेले इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून सर्व शक्यतांचा विचार करून चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी घाटी हॉस्पिटल आणि गौडा यांच्या मित्रांकडेही चौकशी करण्यात येणार असून काही धागेदोरे मिळतात का याची चौकशी पोलीस करत आहेत.