देशाचे तुकडे कसे करायचे हेच मोदींना वर्षानुवर्षे त्यांच्या संघटनेने शिकवलंय, राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींवर प्रहार

Congress leader Rahul Gandhi at Raj Ghat in New Delhi: The enemies of the country made full efforts to destroy the economy of the country, but what our enemies could not do, is now being done by PM Narendra Modi today. pic.twitter.com/pBGuk3ViWv
— ANI (@ANI) December 23, 2019
देशाचे शत्रू जे काम करू शकले नाहीत ते काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण दमाने करत आहेत. देशाचा विकास कसा नष्ट होईल, देशाचा आवाज कसा दबेल हेच मोदी पाहत आहेत. देशाचे तुकडे कसे करायचे हेच मोदींना वर्षानुवर्षे त्यांच्या संघटनेने शिकवलंय; पण या देशाची जनता तुम्हाला या देशावर आक्रमण करू देणार नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. दिल्ली येथील राजघाटावर काँग्रेसच्यावतीने आज सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘नरेंद्र मोदी न्यायव्यवस्थेवर दबाव टाकतात, विद्यार्थ्यांवर लाठी चालवतात, पत्रकारांना धमकावतात. जेव्हा तुम्ही नोकऱ्या हिसकावता, उद्योगधंदे बंद करता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज दाबायचाच प्रयत्न करत असता. तुम्ही काँग्रेसला विरोध करता, पण मला तुम्हाला सांगायचे आहे, हा काँग्रेस पक्ष नव्हे, हा देशाचा आवाज आहे. मला तुम्हाला आणि तुमचा मित्र अमित शहाला सांगायचंय की हा आवाज भारतमातेचा आहे. तुम्ही हा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला भारतमाता त्याचं उत्तर देणार आहे.’
नरेंद्र मोदींना उद्धेशून ते म्हणाले कि , ‘तुम्ही तरुणांना सांगा की तुम्ही तरुणांना रोजगार का दिला नाही. नरेंद्र मोदी बाहेर या आणि सांगा तुम्ही व्यापाऱ्यांना उद्योग, तरुणांना रोजगार का देऊ शकत नाही,’ असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, ‘देशाचे तुकडे कसे करायचे हेच तुम्हाला वर्षानुवर्षे तुमच्या संघटनेने शिकवलंय. पण या देशाची जनता तुम्हाला या देशावर आक्रमण करायला देणार नाही. ही राज्यघटना देशातल्या प्रत्येक व्यक्तीने बनवलीय. प्रत्येकाचा आवाज यात आहे.’ तुम्ही कपड्यांवरून आंदोलनकर्ते ओळखू नका. तुम्ही कपड्यांचं बोलूच नका. तुमचा दोन कोटी रुपयांचा सूट सांगतो तुम्हा काय आहात, असा हल्लाबोल राहुल यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध होत असताना एका सभेत मोदींनी हे वक्तव्य केलं होतं. आंदोलनकर्ते कोण आहेत ते त्यांच्या कपड्यांवरून कळतं, असा टोला मोदींनी अप्रत्यक्षपणे मुस्लिमांना लगावला होता. त्याचा राहुल यांनी यावेळी समाचार घेतला.
पंतप्रधान मोदीजी तुम्ही काँग्रेस पक्षाशी लढत नाहीत, गैरसमजात राहू नका. हा केवळ काँग्रेस पक्ष नाही, तर देशाचा आवाज आहे. देशाच्या आवाजाविरोधात तुम्ही उभा आहात. मी तुम्हाला व तुमचे मित्र अमित शाह यांना सांगू इच्छितो की, हा आवाज काँग्रेसचा नाहीतर भारतमातेचा आवाज आहे. तुम्ही ही गोष्ट विसरू नका की जर तुम्ही भारत मातेच्या आवाजाला, विद्यार्थ्यांना, माध्यमांना, न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न कराल, तर देश तुम्हाला याचे जबरदस्त उत्तर देणार असल्याचे राहुल म्हणाले.