Aurangabad Crime : अट्टल दुचाकीचोर गजाआड, चोरीच्या दोन बुलेट जप्त ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

औरंंंगाबाद : चोरीच्या दुचाकी ग्रामीण भागात नेवून विक्री करणा-या चोरट्यास ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.२१) गजाआड केले. चोरट्याच्या ताब्यातून पोलिसांनी १ लाख ९५ हजार रूपये किमतीच्या चोरीच्या दोन बुलेट जप्त केल्या असल्याची माहिती ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम बिसन खाजेकर (वय २५, रा.खुलताबाद) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. खुलताबाद येथील राम खाजेकर हा चोरीच्या दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक सचिन सोळुंखे, जमादार नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, सुनील खरात, शेख नदीम, बाबासाहेब नवले आदींच्या पथकाने राम खाजेकर याला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, राम खाजेकर याने चोरी केलेल्या दोन बुलेट पोलिसांना काढुन दिल्या. या बुलेट खाजेकर याने आपला मामा बाबासाहेब त्रिभूवन (रा. वेरूळ) याच्या मदतीने चोरल्या असल्याचे सांगितले.
ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुचाकींसह जीप लंपास
औरंगाबाद : चोरांनी दुचाकींसह जीप लांबविल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना वाळुज आणि रेल्वे स्टेशन एमआयडीसी भागात घडल्या. गजानन धनाजी आहेर (३८, रा. शिवाजीनगर, गंगा कॉलनी, वाळुज) यांनी १७ डिसेंबर रोजी रात्री त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री चोराने हँडल लॉक तोडून त्यांची दुचाकी लांबविली. तत्पुर्वी आकाश विलास प्रेमभरे (२९, रा. तुर्काबाद खराडी) यांनी मित्राची दुचाकी वापरण्यासाठी घेतली होती. १४ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी दुचाकी घरासमोर उभी केली होती. ही दुचाकी चोराने हँडल लॉक तोडून त्यांच्या घरासमोरुन लांबविली. तसेच प्राध्यापक सतिश संपतलाल सुराणा (५६, रा. नुतन हाऊसिंग सोसायटी) यांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास रेल्वे स्टेशन एमआयडीसीमध्ये त्यांची जीप उभी केली होती. त्यांची जीप अवघ्या दोन तासात बनावट चावीने चोराने लांबविली. याप्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.