Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CAA च्या विरोधातील आंदोलनात आतापर्यंत उत्तर प्रदेशात १३ जणांचा मृत्यू

Spread the love

मोदी सरकारने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभर उग्र आंदोलन होत असून काही ठिकाणी झालेल्या हिंसक आंदोलनात उत्तर प्रदेशात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  पोलीस महासंचालकांनीच हि माहिती दिली आहे. बिजनोर, संभल, फिरोजाबाद, मेरठ आणि कानपूरमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता आता ती संख्या वाढून १३ वर पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात १५ जिल्ह्यांमध्ये हिंसक घटना घडल्या.  संतप्त जमावाने रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली असून सध्या तणावाचं वातावरण आहे. जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांसह सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले  आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आज  एमआयएम हैदराबादमध्ये आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे आज राजदकडून बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने २१ जिल्ह्यांमधील इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान  सीलमपूर, जाफराबाद भागातही निदर्शकांनी रस्ते बंद केले असल्याचे वृत्त आहे. दिल्लीतली ७ मेट्रो स्टेशन्स आजही बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशात गोरखपूर भागात पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक झाली होती. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली होती. शुक्रवारी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!