Aurangabad News : वाळुजमध्ये विविध घटनेत तिघांचा मृत्यू , दोघांची आत्महत्या, तर एकीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळुज परिसरातील कामगार चौकात असलेल्या सोसायटीत दोन जणांनी गळफास घेवून आत्महत्या केली. तर स्पर्धा परिक्षेचे शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीचा पाय घसरून खाली पडल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
एमआयडीसी वाळुज परिसरातील गिरीराज हौसींग सोसायटी येथे राहणा-या विकास सुभाष भामरे (वय ३२) व श्वेता नवनाथ गिरी (वय २२) या दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. विकास भामरे व श्वेता गिरी यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू न शकल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुस-या घटनेत, स्पर्धा परिक्षेची तयारी करणारी सुनिता देविदास शेळके (वय २१, रा.रांजणगांव-शेणपुंजी) ही तरूणी बुधवारी सकाळी आपल्या बहिणीसोबत वार्मअप करण्यासाठी खवड्याचा डोंगर परिसरात असलेल्या टेकडीवर गेली होती. टेकडीवर चढत असतांना अचानकपणे सुनिताचा तोल गेल्याने ती ४० ते ५० पुâट खोल खंदकात कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनिता शेळके हिला तिची बहिण श्वेता शेळके हिने उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, उपचार सुरू असतांना सुनिताचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.