Aurangabad Crime : महाठग रामनिवास भंडारीला पोलिसांनी घातल्या बेड्या

औरंगाबाद – राज्यातील बहुतेक पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या महाठग रामनिवास भंडारी याला अदालत रोडवरील मनमंदीर ट्रॅव्हल्स समोर क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद, मुंबई, पुणे, अहमदनगर, बुलढाणा, रायगड, सातारा, नाशिकक या प्रमुख शहरांसहित अनेक ठिकाणी रामनिवास भंडारीवर आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत. व बहुतेक प्रकरणात तो न्यायालयात तारखेला हजर राहात नसल्यामुळे कोर्टाने त्याच्या विरोधात अटक वाॅरंट बजावले होते. सोमवारी रात्री ९.३० सुमारा भंडारी हा अदालतरोडवर येणार असल्याची माहिती पोलिसांनी कळली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिस निरीक्षक उत्तम मुळंक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राहूब सूर्यतळ , नसीमखान पठाण यांनी कारवाई पार पाडली.