Aurangabad Crime : तीन महिन्यांपासून जन्मदात्या आईवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम मुलगा गजाआड , दोन दिवसाची पोलीस कोठडी

मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली असून या धक्कादायक घटनेमध्ये मुलानेच जन्मदात्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पाहिले पोलीस ठाण्यात दिली असून सिडको पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या खेदजनक घटनेची अधिक माहिती अशी की, सदर पीडितेच्या पतीचे गेल्या सात वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला दोन मुली आणि दोन मुले आहेत त्यापैकी मोठी मुलगी विवाहित असून ती सासरी राहते. तर दुसरी मुलगी मुंबई येथे एका कंपनीत कार्यरत आहे . दोन मुले आईसोबत राहतात . त्यापैकी २० वर्षीय आरोपी मुलगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. कुठलाही कामधंदा न करता तो घरीच राहतो आणि पीडित आईसह लहान भाऊ आणि अधून मधून घरी येणाऱ्या बहिणींना धमकावून दारू पिण्यासाठी पैसे मागतो . पैसे न दिल्यास शिवीगाळ करून मारहाण करतो आणि जीवे मारण्याच्या धमक्या देतो.
पोलिसांनी दिलेल्या धक्कादायक माहिती नुसार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सदर आरोपी स्वतःच्या जन्मदात्या आईवर गेल्या तीन महिन्यापासून लैंगिक अत्याचार करीत आहे. या प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची आणि स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्यामुळे बदनामीच्या भीतीने सदर पीडितेने याबाबत कोणालाही काही सांगितले नव्हते.
दरम्यान पोलिसात दिलेल्या फिर्यादीत या पीडित आईने म्हटले आहे की १० डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ती कामावरून घरी आल्यानंतर आराम करत असताना एक मुलगा बाहेर गेलेला होता, त्याच वेळी आरोपी मुलगा दारू पिऊन घरी आला आणि घराच्या दाराला आतून कडी लावून घेत नेहमीप्रमाणे लैंगिक अत्याचार करायला सुरुवात सुरुवात केली या सर्व प्रकाराने मानसिकदृष्ट्या खचलेल्या आणि त्रस्त झालेल्या आईने शेवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाविरुद्ध तक्रार दिली. सिडको पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.