Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हैदराबाद एन्काउंटर : लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा – एस. ए. बोबडे

Spread the love

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी स्पष्टपणे नमूद केले की, सत्य जाणून घेण्याचा लोकांना अधिकार आहे त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होने गरजेचे आहे. तुम्हाला पोलिसांविरोधात गुन्हेगारी खटला चालवायचा असेल, तर आम्ही कोणताही आदेश देणार नसल्याचेही त्यांनी राज्य पोलीस विभागाला सांगितले.

हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात येत आहे. तेलंगण सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत आहेत. लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी पोलीस विभागाला सांगितले. दरम्यान आरोपी सराईत गुन्हेगार होते का? असा प्रश्न देखील सरन्यायाधीशांनी तेलंगणा पोलिसांना विचारला. त्यावर आरोपी हे ट्रकचालक आणि क्लीनर असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळी आरोपींना घेऊन जात असताना, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन झाल्यामुळे पोलीस रात्री त्यांना घटनास्थळी घेऊन गेले. दरम्यान आरोपींना बेड्या घातल्या नव्हत्या. त्यांनी पोलिसांकडील बंदूक हिसकावली, पोलिसांवर दगडफेकही केली, अशी माहिती पोलिसांच्या वतीने रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात दिली.

चारही आरोपींनी पोलिसांवर आधी हल्ला केला का?  आरोपींनी पोलिसांकडील बंदूक हिसकावली का? त्यातून पोलिसांवर गोळीबार केला का? असे प्रश्नही विचारले. त्यावर आरोपींनी गोळीबार केला, मात्र पोलिसांना गोळी लागली नाही, असे रोहतगी यांनी सांगितले. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण होणार असून, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर हे या आयोगाचे अध्यक्ष असतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!