Aurangabad : विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

बाल्कनीमधुन पडून जखमी झालेल्या चिमूकल्याचा मृत्यू
औरंंंगाबाद : घरात खेळत असतांना अचानकपणे बाल्कनीतून पडून जखमी झालेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. रेहान सलीम पटेल (वय ४, रा.मिसारवाडी) असे बाल्कनीमधुन पडून जखमी झालेल्या चिमूकल्याचे नाव आहे.
रेहान सलीम पटेल हा चिमूकला ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोन मजली घरातील बाल्कनीमध्ये खेळत होता. खेळत असतांना अचानकपणे त्याचा तोल जावून तो खाली पडून गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या रेहान पटेल याच्यावर एमजीएम रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. रेहान पटेल याच्यावर उपचार सुरू असतांना ३ डिसेंबर रोजी रेहान पटेल याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार बिरारे करीत आहेत.
——————————————————-
तलावात बुडालेल्या युवकाचा मृत्यू
औरंंंगाबाद : पैठण रोडवरील वाल्मी परिसरातील तलावात बुडालेल्या विजय साहेबराव धनेधर (वय ४०, रा.आंबेडकर पुतळ्याजवळ, सातारा परिसर) यांचा मृत्यू झाला. विजय धनेधर हे ३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाल्मी परिसरातील तलावात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. तलावातील खोल पाण्यात बुडाल्याने विजय धनेधर हे बेशुध्द झाले होते. धनेधर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार चौव्हाण करीत आहेत.
——————————————————-
गरम पाण्यात पडून भाजलेल्या चिमूकलीचा मृत्यू
औरंंंगाबाद : घरात खेळत असतांना अचानकपणे गरम पाण्याच्या पातेल्यात पडून भाजलेल्या ३ वर्षीय चिमूकलीचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. आराध्या आकाश शिंदे (वय ३, रा.बायजीपुरा) असे गरम पाण्यात पडून मृत्यूमुखी पडलेल्या चिमूकलीचे नाव आहे.
आराध्या शिंदे ही चिमूकली २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या घरी खेळत होती. त्यावेळी ती अचानकपणे गरम पाण्याच्या पातेल्यात पडून भाजली होती. गंभीररित्या भाजलेल्या आराध्या शिंदे हिला आकाश अशोक शिंदे यांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले होते. आराध्या हिच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी (दि.४) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.