Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : गर्भपात आणि कामोत्तेजक औषधी बाळगणारा जेरबंद

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : गर्भपाताच्या किट आणि कामोत्तेजक औषधी जवळ बाळगणार्‍या भारत जनार्दन सभादिंडे (वय ४५, रा.आनंदनगर, गारखेडा परिसर) याला अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने जेरबंद केले.

Advertisements

१९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भारत सभादिंडे हा गर्भपाताच्या किट व कामोत्तेजक औषधी घेवून सिडको बसस्थानकातून दिपाली हॉटेल चौकाकडे जात होता. त्यावेळी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न व औषध निरीक्षक राजगोपाल मुलचंद बजाज (वय ५१) यांनी आपल्या पथकाच्या मदतीने भारत सभादिंडे याला अडविले. त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता, त्यात गर्भपाताच्या किट व कामोत्तेजक औषधीचा साठा मिळून आला.

Advertisements
Advertisements

या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक म्हस्के करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!