Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : भाजप -सेनेचे सरकार बनावे म्हणून रामदास आठवले आपला फॉर्म्युला घेऊन नेत्यांच्या दारात …

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत स्वतः भाजपचे राष्ट्रे अध्यक्ष अमित शहा शांत , स्वतः नरेंद्र मोदी शांत पण संजय राऊत विधानसभेचे निकाल लागले तेंव्हापासून बोलत आहेत. पवारांनीही या विषयावर भाष्य करणे  आज सपशेल टाळले . आता रिपब्लिकन नेते केंद्रीय भाजप कडून स्वतःच मैदानात उठले आहेत.  त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीत युतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा झाली. असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे . संजय राऊत यांनी मात्र त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

Advertisements

वृत्त असे आहे कि , रामदास आठवले यांनी आज नवी दिल्लीत संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी आठवले यांनी राऊत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. आठवले यांनी मुख्यमंत्रिपदासाठी 3-2 असा फॉर्म्युला त्यांच्यासमोर ठेवला. 3 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असा आठवलेंनी प्रस्ताव मांडला. भाजपही या प्रस्तावावर विचार करायला तयार आहे, मी याबाबत भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहे, अशी माहिती आठवले यांनी ए एन आय  वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. परंतु, त्यांच्या या भेटीबद्दल संजय राऊत यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आता रामदास आठवले यांनी दोन्ही पक्षांची मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचा हा प्रस्ताव शिवसेनेचे सोडा भाजपाला तरी मेनी होईल का ? असा प्रश्न आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!