Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

थेट राजधानीतून : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ , मोदींनी व्यक्त केला विकासाला गती देण्याचा विश्वास

Spread the love

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, सर्व विषयावर साधकबाधक चर्चा व्हावी. मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन देशाच्या विकासाला गती देईल.”

अधिवेशनाला सुरूवात होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले कि ,  “संसदेच्या अधिवेशनामध्ये संवाद, चर्चा व्हावी. सर्व विषयांवर सर्वांगिक चर्चा व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन आहे. संविधानामुळे देशाची एकता, अखंडता टिकून आहेत. या वर्षीचे हे अखेरचे सत्र आहे तसेच राज्यसभेचे २५० वे अधिवेशन आहे. मागील अधिवेशन अभूतपूर्व होते. त्यात सर्वाधिक कामकाज झाले. याचे श्रेय सर्व पक्षांच्या खासदारांचे आहे. आता आशा आहे की आता हे हिवाळी अधिवेशनही असेच सर्वाधिक कामकाजाचे ठरेल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. दरम्यान अधिवेशन काळात विरोधकांनी जास्तीत जास्त कामकाज होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही  मोदी त्यांनी केले.

आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात सरकार बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय ( हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) निर्वासितांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार करत आहे. हिवाळी अधिवेशनातच ते संमत केले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्र सरकारने वटहुकूम काढलेला आहे. ई – सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्यासंदर्भातही वटहुकूम काढलेला आहे. हे विधेयकही मंजूर करून घेण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!