भाजपशिवाय कुणाचेही सरकार बनू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपकडे ११९ आमदार आहेत, त्यांना घेतल्याशिवाय राज्यात कुणाचेही सरकार बनू शकणार नाही. राज्यात सरकार भाजपचेच असेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. भाजपचे विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कालच राज्यात भाजपशिवाय राज्यात कुणाचेही सरकार येणार नाही, असा दावा केला होता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपच्या बैठकीतील माहिती दिली, आमचीही राज्यातील राजकीय घडामोडींवर नजर असल्याचे सांगितले. भाजपचे १०५ आमदार असून आम्हाला १४ अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमच्याशिवाय कुणाचेही सरकार बनू शकणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही आजच्या बैठकीत हेच स्पष्ट केले असल्याचेही त्यांनी सांगितले.