Aurangabad Crime : जन्मदात्या पित्याने केले अल्पवयीन मुलीवर अत्याचार

औरंंंगाबाद : जन्मदात्या पित्याने आपल्याच पोटच्या गोळ्यावर अत्याचार केल्याची घटना माळीवाडा परिसरात उघडकीस आली. दौलताबाद पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून त्या नरधामपित्याला अटक केली. विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. माळीवाडा येथे राहणा-या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोट दुखीचा त्रास होत असल्यामुळे तिला तिच्या आई – वडिलांनी उपचारासाठी दौलताबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेले. त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी केली असता त्यांनी अल्पवयीन मुलगी दिड महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. त्या मुलीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला वैद्यकीय अधिका-यांनी दिला.
अल्पवयीन मुलीस उपचारसाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर न्यायालयात तिचा इनकॅमेरा जबाब नोंदविण्यात आला त्यावेळी वडिल दिड महिन्यांपासून लैगिक अत्याचार करत असल्याचे सांगितले. दरम्यान जन्मदात्या पित्या विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.