महाराष्ट्राचे राजकारण : संजय राऊत यांची शरद पवारांशी दिवाळी भेट

Sanjay Raut, Shiv Sena: Met Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar at his residence today. I had come to wish him on the occasion of Diwali. We also discussed the politics in Maharashtra. (file pic) pic.twitter.com/AUuxC5WIRu
— ANI (@ANI) October 31, 2019
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपामध्ये तणावाचे वातावरण असले तरी शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि त्यांच्यात राज्यातील राजकारणावरही चर्चा झाली.
दरम्यान आपल्या पक्षाच्या गट नेत्याला आणि काही आमदारांना घेऊन राज्यपालांकडे घेऊन दिवाळी भेट आणि शेतकऱ्यांच्या व मच्छीमारांच्या समस्या घेऊन गेलेल्या आदित्य ठाकरे यांच्याकडेही शंकेने पहिले जात आहे .
दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेचा पेच सुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन महत्वाच्या नेत्यांमध्ये दिवाळीनिमित्त झालेल्या भेटवरही प्रसार माध्यमे चर्चा घडवून अनंत आहेत . या भेटीवरून कयास लावण्यात येत आहे कि . भाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केला जात आहे . निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने आम्हाला सत्तास्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राऊत आणि पवार यांच्या दिवाळी भेटीकडे पहिले जात आहे.