उदयनराजे यांच्या पराभवाचा खा. संभाजी महाराजांना धक्का , नव्या सरकारला त्यांनी केली हि विनंती…

उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा पोट निवडणुकीतील पराभवाचा आपणास जबर धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया खा . छत्रपती संभाजी महाराज दिली आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करीत आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता . त्यामुळे झालेल्या पॉट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी जवळपास एक लाखांहून अधिक मताधिक्याने उदयनराजेंचा पराभव केला. उदनराजेंच्या पराभवानंतर कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना संहाबाजी राजे म्हणाले कि , “छत्रपती उदयनराजे यांचा पराभव म्हणजे आमचा पराभव आहे. त्यांच्या पराभवाचं आम्हाला मनापासून दु:ख आहे. मात्र सुख-दु:ख पाहण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे, आजचा पराजय हा उद्याच विजय कसा असेल? याचा छत्रपती उदयनराजे नक्की विचार करत असतील. पद हा एक भाग आहे, मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा”.
नव्या सरकार बाबत बोलताना ते म्हणाले कि , “एक तरी कॅबिनेटची मिटिंग ही रायगडावर घ्यावी अशी माझी विनंती यापुढे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना असेल”. तसेच नवीन आमदारांना विनंती करताना , “गावाचा विकास करायचा असेल, तर प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या, त्यासाठी रायगडावर जाऊन नतमस्तक व्हा, फक्त जयजयकार करून चालणार नाही”, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले.