Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सत्तास्थापनेसाठी अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच , बंडखोर आमदार गीता जैन यांचा भाजपला पाठिंबा

Spread the love

सत्तस्थापनेत बार्गेनिंग पॉवर वाढावी म्हणून  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप सेनेमध्ये चांगलीच  स्पर्धा निर्माण झाली असून एक एक अपक्षाला आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न दोन्हीही पक्षांकडून केला जात आहे ऐन दिवाळीतही हा सिलसिला चालूच होता .  त्याचाच एक भाग म्हणून आणखी एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या संख्याबळाच्या एकाने पुन्हा वाढ झाली आहे त्यापूर्वी प्रहारच्या दोन आमदारांनी सेनेला पाठिंबा दिला होता .

अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गीता जैन या मीरा-भायंदरमधून निवडून आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारलं होते. त्यामुळे त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहतांविरोधात बंड करून  या निवडणुकीत जैन यांनी मेहता यांचा १५ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा भाजपलाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भाजपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढलं आहे.

या आधी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव केला आहे. या भेटीनंतर त्यांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. युतीमध्ये शिवसेनेला जागा सुटल्याने राऊत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांना ९५ हजार ४८२ मतं मिळाली. तर सोपल यांना ९२ हजार ४०६ मतं मिळाली. राजेंद्र राऊत यांचा ३०७६ मताधिक्यांनी पराभव झाला.

दरम्यान, भाजपप्रमाणेच शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचीही संख्या वाढत आहेत. अपक्ष आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल, आशिष जयस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर आदी आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ ५६ वरून ६० वर पोहोचलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!