Aurangabad : शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकुळ, कारसह तीन दुचाकी लंपास

औरंंंगाबाद : शहर परिसरात वाहन चोरट्यांनी दिवाळी धमाका करीत धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून एका कारसह तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. वाढत्या वाहन चोर्या रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
मुकुंदवाडी परिसरातील शिवाजी कॉलनी येथील रहिवासी मोहन कान्हु पट्टे (वय ४३) यांची ४ लाख रूपये किंमतीची तवेरा कार क्रमांक (एमएच-२०-डीएफ-०५०७) चोरट्याने २४ ऑक्टोबरच्या रात्री घराजवळून चोरून नेली. रमेश अंबरसिंग चव्हाण (वय ३५, रा.खेरज, ता.पैठण) यांची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीवाय-५७७२) चोरट्याने १८ ऑक्टोबर रोजी मुकुंदवाडी परिसरातील सह्याद्री हॉस्पीटलजवळून चोरून नेली. प्रविण चैनकदन चंडालिया (रा.मोतीकारंजा, न्यु.चौराहा) यांची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीके-८४६३) चोरट्याने २४ ऑक्टोबर रोजी मोतीकारंजा येथून चोरून नेली. योगेश भास्कर शिंदे (वय २४, रा.वळदगाव) यांची ६५ हजार रूपये किंमतीची बुलेट क्रमांक (एमएच-२०-ईएम-१३४८) चोरट्याने २९ सप्टेंबर रोजी वळदगाव येथून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून कारसह दुचाकी वाहने चोरून नेणार्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे मुकुंदवाडी – २, सिटीचौक -१, सातारा-१ असे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
———————————————————————
वाळूज मधील कंपनीतून लाखो रूपयांचा ऐवज लंपास
औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळुज परिसरातील मास्टरलाईन लुब्रीकंन्ट प्रा.लि.कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी ४ लाख ३० हजार ९७८ रूपये किंमतीचे लुब्रीकेंट ऑईल, संगणकाचे सीपीयु, डीव्हीआर आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले. ही घटना २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय दिलीप इंगळे (वय ३६, रा. हरिश्चंद्र रेसिडेन्सी, सिडको वाळुज महानगर-०१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बांगर करीत आहेत.