Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नव्या सरकारमध्ये शिवसेनेला नेमकं काय हवं आहे ? आज मातोश्रीवर होतेय बैठक…

Spread the love

विधानसभेच्या निकालानंतर भाजपला मिळालेली मते आणि त्यामुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेऊन शिवसेना आक्रमक मूडमध्ये असून आदित्य ठाकरे या तरूण नेतृत्वाने महाराष्ट्राची धुरा वाहावी, महत्वाच्या खात्यांचे सम समान वाटप व्हावे  अशी इच्छा शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारही त्यासाठी आग्रही आहेत. उद्या उद्धव यांच्यासोबत मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत यावर जोर दिला जाण्याची शक्यता आहे. ” हीच योग्य वेळ ” समजून शिवसेनेला राज्याचं नेतृत्व करण्याची चांगली संधी चालून आली आहे. ही संधी दवडता नये, असे शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचेही मत असून या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे आणि भाजपचे लक्ष लागलेले आहे. 


दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला अपेक्षित जागा न मिळाल्याने आता या दोन्ही पक्षांनी अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सत्ता स्थापनेपूर्वीच अपक्षांना आपल्या बाजूने खेचून आमदारांचा आकडा वाढवून सत्तेचा जास्तीत जास्त वाटा पदरात पाडून घेण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रामटेकमधून निवडून आलेले अपक्ष आमदार आशिष जैस्वाल आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र गोंडेकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेनेकडून या दोन्ही आमदारांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आल्याचंही सांगण्यात येतं आहे . तर या दोन्ही आमदारांनी आम्ही अपक्ष लढलो असलो तरी शिवसेनेसोबतच असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या भेटीत सांगितले आहे. निवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत १५ अपक्ष आमदार आपल्या संपर्कांत असल्याचे म्हटलं होतं. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आपली ताकद जास्त असल्याचाच इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेनेही अधिकाधिक अपक्षांना आपल्या पक्षात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची आणि महत्त्वाची बैठक उद्या (शनिवारी) दुपारी १२ वाजता मातोश्री निवासस्थानी होत आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांचा कल जाणून घेणार असून त्यानंतरच सेनेची पुढची दिशा ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी सर्व सेनेचे सर्व आमदार आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राने पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेसाठी कौल दिला असला तरी यावेळी दोन्ही पक्षांचं संख्याबळ पाहिल्यास शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत राहणार आहे. भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या असून बहुमताचा १४५ हा आकडा लक्षात घेता शिवसेनेच्या तालावरच भाजपला चालावं लागणार आहे. त्यामुळेच गेली पाच वर्षे भाजपमागे फरफटत जाणाऱ्या शिवसेनेने निकाल स्पष्ट झाल्यानंतर लगेचच भाजपची कोंडी करायला सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या ५०-५० फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. आपल्यात जे ठरलंय त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे. जागावाटपात समजून घेतलं पण सत्तावाटपात मी समजून घेणार नाही, असा शिवसेना स्टाइल सूर उद्धव यांनी या पत्रकार परिषदेत लावला होता. त्यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारही आता या मागणीवर जोर देऊ लागले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!