Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतल्या बातम्या : सहा एक्झिट पोलच्या नंतर व्हिडीपीएच्या नव्या सर्व्हे मध्ये वंचित आणि मनसेला मिळणार इतक्या जागा, महायुतीला स्पष्ट बहुमत नाहीच

Spread the love

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे २४ ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. पण त्याआधी मात्र एक्झिट पोलच्या माध्यमातून कोण बाजी मारणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने व्हिडीपीए च्या सौजन्याने दिलेल्या एक्झिट पोलनुसार, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे आपलं खातं खोलणार असल्याचं म्हटलं आहे . दरम्यान  एक्झिट पोलचे सर्वे काहीही  असले तरी प्रत्यक्षात Exact Poll मध्ये नक्की काय होईल हे मात्र उद्या समजणार आहे.

व्हिडीपीए च्या सौजन्याने दिलेला नवा एक्झिट पोल

भाजप – 126-135

शिवसेना – 79-88

काँग्रेस – 16-26

राष्ट्रवादी – 33-43

मनसे – 1

वंचित – 2-5

इतर – 5-13

दरम्यान न्यूज १८ लोकमत   आणि आयपीएसओएस ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीसह सर्व इतर माध्यमांनी केलेल्या एक्झिटपोल  निकालांमध्ये भाजप – शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असे म्हटले आहे.  मात्र, व्हिडीपीएने दिलेल्या अंदाजानुसार, भाजपला बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर ६ एक्झिट पोल्सच्या निकालांमध्ये सर्वांनीच भाजप युतीला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांचा आकडा गाठावा लागतो.

महायुतीला २४३ जागा मिळण्याचा अंदाज न्यूज १८ लोकमतच्या एक्झिटपोल मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला ४१ जागा मिळतील, असं हा Exit Poll चा निकाल सांगतो. युतीला सर्वांत कमी जागा इंडिया टुडे अॅक्सिसने केलल्या मतदानोत्तर चाचणीत दिल्या आहेत. त्यांच्या सर्व्हेनुसार, भाजप-सेना महायुती – १६६-१९४, काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी – ७२-९० जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस आघाडीला जास्तीत जास्त ९० जागा मिळतील असा अंदाज या एकमेव एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. यापेक्षा जास्त जागा आघाडीला कुठल्यागी एक्झिट पोलने दिलेल्या नाहीत.दरम्यान न्यूज १८ लोकमत च्या एक्झिटपोलमध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

एक्झिट पोलचे सर्वे असे असले तरी प्रत्यक्षात Exact Poll मध्ये नक्की काय होईल हे मात्र उद्या समजणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!